Sunil Tatkare Statement News: दिवाळीनंतर राष्ट्रवादीचे आमदार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर जाणार आहे. बैठकीनंतर सुनील तटकरेंनी माहिती दिली आहे. आज देवगिरीवर सुनेत्रा पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. यानंतर खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तसेच बैठक, अर्थखात्याच्या चर्चेबाबत माहिती दिली आहे. तसेच रोहित पवारांवर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली.