पुणे : भारतीय अष्टपैलू खेळाडू प्रेमा रावत हिने अवघ्या १४ चेंडूंत नाबाद अर्धशतक झळकावत क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव कोरले आहे. वरिष्ठांच्या महिला टी-२० चषक स्. वरिष्ठांच्या महिला टी-२० चषक स्पर्धेत तिने महिला टी-२० क्रिकेटमधील सर्वात वेगवान अर्धशतकाचा नवा जागतिक विक्रम नोंदवला. .पुण्यात पार पडलेल्या या सामन्यात उत्तराखंडचे प्रतिनिधित्व करताना २४ वर्षीय प्रेमाने ३५७ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. तिने आपल्या तुफानी खेळीत ६ चौकार, ४ षटकारांसह नाबाद ५० धावा ठोकल्या.