Gokul Election: शासन नियुक्त संचालकांमध्ये हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ, माजी संचालिका शौमिका महाडिक आणि अशोक फरकटे यांच्या नावाची चर्चा आहे. Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीत पेचप्रसंग निर्माण झाला आहे. गोकुळच्या पोटनियमाचा आधार घेत महायुतीच्या 12 संचालकांनी गोकुळच्या अध्यक्ष निवडीला दांडी मारल्यानंतर आता हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे. न्यायालयाने त्यांना 10 नोव्हेंबर तारीख देत बैठकीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.