अनेकांना झोपेत साप दिसतो. त्यामुळे झोपेतून दचकून जाग येते. काही जणांना त्या स्वप्नाची भीती वाटते, मग दिवसभर तेच विचार डोक्यात सुरू असतात. पण तुम्हाला माहित आहे की साप झोपेत का दिसतात? त्यामागे काय नेमका काय अर्थ दडलेला असतो. चला जाणून घ्या. रात्री शांत झोप लागलेली असते आणि अचनाक स्वप्नात साप दिसतो. कधी तो आपल्या समोर फणा काढून उभा असतो, तर कधी आपला पाठलाग करत असतो. काही वेळा तर साप चावल्याचंही स्वप्न पडतं.