छत्रपती संभाजीनगर : शहरात पाण्याची टंचाई असताना आणि महापालिका प्रशासनाकडून पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे दुरुस्तीच्या कामात लाखो लिटर पा. जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हच्या दुरुस्तीसाठी सोमवारी (दि.२) दुपारी जलवाहिनीतील पाणी थेट रस्त्यावर सोडण्यात आले. पाण्याचा मोठा प्रवाह रस्त्यावरून वाहत गटारात गेल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत..टीव्ही सेंटर जलकुंभाला पाणीपुरवठा करणाऱ्या १५०० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात गळती होत होती.