पांढरेवाडी: कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीमुळे एकीकडे कारखानदारीचा विस्तार झाला असला तरी प्रदूषणामुळे आसपासच्या परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. स्थानिक शे. स्थानिक शेतकऱ्यांच्या नैसर्गिक जलस्रोतांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कुरकुंभ येथील शेतकरी मोहन अण्णा भोसले यांच्या विहिरीत आणि विहिरीच्या परिसरात दूषित पाणी उतरले आहे. विहिरीतील पाण्यावर हिरवट थर दिसून येत आहे. पाण्याला उग्र वास येत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे..