NCP Crisis Parth Pawar: राष्ट्रवादीत प्रचंड खदखद, वरिष्ठ नेत्यांच्या दिल्लीवारीनंतर सुनेत्रा पवारांनी देवगिरी बंगल्यावर बोलवली बैठक, राजकीय वर्तुळाचे लक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती समोर आली होती. मुंबई अध्यक्षपदी झिशान सिद्दकी आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते पदी उमेश पाटील यांची निवड करताना किमान पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्यांना विश्वासात घेणे अपेक्षित होते. मात्र, परस्पर निवड करण्यात असल्याने नेत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.