Pune Rain - मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार सरी; शिवाजीनगरमध्ये ४१.१ मिमी पाऊस, सोमवारी सकाळी पुणेकरांची तारांबळ. पुणे : दिवाळीची खरेदी, घराची साफसफाई, रोषणाईची तयारी... पुणेकरांची सध्या एकच धावपळ सुरू आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून ऑक्टोबर हीटने घाम काढला होता. दुपारचे कडक ऊन आणि रात्रीपर्यंत जाणवणारा उकाडा यामुळे पुणेकर हैराण झाले होते. अशातच रविवारी रात्री पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या सरींनी पहाटेपर्यंत शहराला भिजवून काढले.