सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये दिग्गजांनी नशीब आजमावले आहे. खंडाळा, जावली, महाबळेश्वर, फलटण, कोरेगाव, माण, पाटण, कराड या सोसायटी मतदारसंघांमध्ये उ. तर राखीव जागांवर ठरल्याप्रमाणे काम महायुतीच्या नेत्यांनी केले की एकमेकांचा ‘कार्यक्रम’ केला, हेही उघडकीस येणार आहे. साताऱ्यातील नागरी बँक असोसिएशनच्या सभागृहात मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. ६ टेबलांवर दोन फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण केली जाणार असून दुपारी १ पर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल..बँकेसाठी रविवारी जिल्ह्यातून ९७.९२ टक्के मतदान झाले होते.