NCP Core Committee Meeting: पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पार्थ पवार यांच्यातील समन्वयाचा मुद्दा कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चेला आला. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाचा कारभार सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वानुमते चालला पाहिजे.