सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीतील सहा जागांसाठी आज, मंगळवार, दि. ३ रोजी मिरजेत मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय तयारी. त्यासाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून आठ टेबलांवर मतमोजणी होईल. सहा जागांसाठी १४ उमेदवार रिंगणात होते. मतदान झालेल्या सहापैकी सोसायटी गटाच्या चार जागांमध्ये मोठी रस्सीखेच आहे. गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार यांची लढत लक्षवेधी ठरली.