Satara News : सातारा जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान १ नोव्हेंबर रोजी माण तालुक्यात निवडणूक निरीक्षक असल्याचे भासवून मतदान केंद्रांवर फिरणाऱ्या वैशाली देशपांडे या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. बनावट ओळखपत्राच्या संशयावरून दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र दाखवून मतदान केंद्रात प्रवेश पोलिसांच्या संशयामुळे बोगसगिरीचा पर्दाफाश चालकासह दोघांची चौकशी; दहिवडी पोलिसांत गुन्हा दाखल Satara News : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीदरम्यान माण तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.