वणीजवळ चारचाकीतून गोवंशांची सुटका सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २ : रात्रीच्या वेळी भरधाव जाणाऱ्या संशयित चारचाकीचा पाठलाग करून वणी पोलिसांनी चार गोवंशांची निर्दयतेने होणाऱ्या वाहतुकीतून सुटका केली. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वणी ते पिंपळगाव रोडवरील खेडगाव शिवारामधील हॉटेल जगदंबासमोर करण्यात आली. या कारवाईदरम्यान अंधाराचा फायदा घेऊन गाडी चालक घटनास्थळावरून पसार झाला. पोलीस शिपाई मच्छिंद्र पिठे आणि त्यांचे सहकारी ३१ ऑक्टोबरच्या रात्री वणी गावात गस्त घालत होते.