पान चार ॲंकर ------------ 27391 येवला : शेतातून बिबट्याला हुसकावताना शेतकरी. येवल्यात शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला शेवगे परिसरात खळबळ; आरडाओरडा होताच ठोकली धूम सकाळ वृत्तसेवा येवला, ता. २ : तालुक्यात बिबट्याचा वावर वाढला असून सोमवारी (ता.२) संध्याकाळी शेवगे परिसरात कांदा चाळीत काम करणाऱ्या एका शेतकऱ्यावर बिबट्याने अचानक हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. निफाड तालुक्याच्या शिवारालगत सत्यगाव, मुखेड परिसरात आढळणारे बिबटे आता तालुक्याच्या चारही भागात शिरकाव करून दिसू लागल्याने अगोदरच शेतकऱ्यांमध्ये दहशत आहे.