धुळ्यातमुंबई-आग्रा महामार्गावर पळासनेरजवळ मध्यरात्री दरोडेखोरांनी कुरियर कंपनीच्या कारवर सिनेस्टाईल हल्ला केला. यावेळी दोन कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना निर्जनस्थळी सोडत कारमधील रोकड हिसकावून दरोडेखोरांनी पलायन केले आहे. मनेष मसोळे, टीव्ही ९ मराठी, प्रतिनिधी : - धुळे जिल्ह्यातील मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांची रोकड लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.