जळगाव हे शहर सुवर्णनगरी म्हणून ओळखले जाते. येथील सराफा बाजारात सोनं महागलं आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदी दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांत पाहायचे झाल्यास सोन्याचा भाव वाढतच असल्याचे आपल्याला दिसून येईल. परंतु अलिकडे सोन्याचा भाव चांगलाच घसरतोय. पुढच्या काही दिवसांत सोनं असंच घसरणीला लगावं, अशी भावना सामान्यांकडून व्यक्त केली जात होती. परंतु आता सोन्याने सर्वांनाच थक्क करून टाकलं आहे.