-प्रज्वल रामटेके पुणे : यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात पुणे शहरात परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. संपूर्ण महिन्यात शहरातील शिवाजीनगर वेधशाळेच्या. संपूर्ण महिन्यात शहरातील शिवाजीनगर वेधशाळेच्या हद्दीत महिनाभरात केवळ १.७ मिलिमीटर इतक्या अत्यंत नगण्य पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या दडीमुळे शहरात कोरडे हवामान निर्माण झाले असून, तापमानात लक्षणीय वाढ जाणवत आहे. सर्वसाधारणपणे ऑक्टोबर महिन्यात पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतात. मात्र, यंदा महिनाभरात केवळ दोनच दिवस पावसाने हजेरी लावली.