If aid is to be provided across the board, then why conduct damage assessments? Farmers' question रेणापूर पुढारी वृत्तसेवा : अवर्षणामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पाच हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम थेट खात्यात जमा करण्याचे आश्वासनही देण्यात आले. मग सरसकट मदत देणार असाल तर पिकांचे पंचनामे कशासाठी केले, असा सवाल रेणापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित करीत आहेत.