नाशिक : दिवाळी आणि छठ पूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील वाढती गर्दी लक्षात घेऊन. १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री तात्पुरती बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी स्थानकावर येणाऱ्या नागरिकांना या काळात प्लॅटफॉर्मवर प्रवेशासाठी तिकीट मिळणार नाही. दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त मोठ्या संख्येने नागरिक रेल्वेने प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्याही चालवण्यात येत आहेत.