चिकलठाणा पोलिसांचा गुन्हेगारांवर 'सर्जिकल स्ट्राईक' लूटमार करणारी टोळी गजाआड ; गोमांस तस्करी, अवैध धंद्यांवर धडक कारवाई. Chikalthana police launch 'surgical strike' on criminals छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी प्रवृत्ती, महामार्गावरील लुटीच्या टोळ्या आणि अवैध धंदे चालवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. ३० व ३१ ऑक्टोबर दरम्यान पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली हद्दीत विशेष कोम्बिंग व कारवाई मोहीम राबवण्यात आली.