Gang war in Vaijapur, reminiscent of Mirzapur; a bloody conflict between two groups! वैजापूर, पुढारी वृत्तसेवा : जुन्या वादाचा वणवा पुन्हा भडकून शनिवारी (दि. ३१) वैजापूरच्या येवला रोड परिसरात अक्षरशः रक्ताचा सडा पडला. कोयते, लोखंडी कत्त्या, लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी एकमेकांवर बेछूट हल्ले करण्यात आले. भरदिवसा घडलेल्या या थरारक संघर्षात अनेक जण जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक आहे. दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत..