कन्नड - तालुक्यातील पळसखेडा येथे उसाच्या शेतात बिबट्याची तीन ते चार पिल्ले आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजेच्या. २ नोव्हेंबर) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ऊसतोडणी सुरू असताना ही पिल्ले मजुरांच्या निदर्शनास आली..पळसखेडा येथील शेतकरी अण्णा शंकर पवार यांच्या गट क्रमांक ६७ मधील शेतात सध्या ऊसतोडणीचे काम सुरू आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ऊसतोड मजूर शेतात गेले असता, उसाच्या सरीमध्ये त्यांना बिबट्याची पिल्ले दिसून आली.