बाजार समितीत कांदा, लिंबू आणि लसणाचे दर अद्यापही चढेच असल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. Prices of onions, lemons, and garlic are soaring छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीत कांदा, लिंबू आणि लसणाचे दर अद्यापही चढेच असल्याने स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे. मात्र, भाजीपाल्याची आवक वाढल्याने शहरातील किरकोळ बाजारात अनेक भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. यात टोमॅटो, वांगी, कोबी, फ्लॉवर, भोपळा आणि काकडीच्या दरात किलोमागे १० ते २० रुपयांची घट झाली आहे.