Gautam Gambhir on Shreyas Iyer IND vs NZ 5th T20 : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी टी-20 संघाचा नवा कर्णधार श्रेयस अय्यर याची पाठराखण केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर अय्यरच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात असताना गंभीर यांनी त्याला समर्थन दिले. फक्त विजय आणि पराभवाच्या आकडेवारीवरून कर्णधाराचे नेतृत्व ठरवता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.