Mumbai Crime News : दिवाळीच्या सणानिमित्त घराची साफसफाई करण्यासाठी अनेकजण ऑनलाइन होम क्लिनिंग सर्व्हिसची मदत घेतात. मात्र, अशीच एक सेवा बुक करणे मुंबईतील एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. घराची स्वच्छता करण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनीच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, साफसफाईचे काम पूर्ण करून कर्मचारी घरातून निघून गेल्यानंतर घरातील दागिने चोरीला गेल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.