गोकुळ दूध संघाची निवडणूक सुरू असतानाच उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 16 ऑक्टोबर रोजी लिहिलेलं पत्र सोशल मीडियामध्ये व्हायरल झालं आहे. Gokul Election: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीमध्ये एकामागोमाग एक धक्कादायक घडामोडी घडत असताना आता आणखी एक लेटर बॉम्ब समोर आला आहे. या पत्रानंतर गोकुळच्या राजकारणासह कोल्हापूरच्या राजकारणामध्ये सुद्धा मोठी खळबळ उडाली आहे.