'कोण होणार करोडपती'च्या मंचावर गौतमी पाटील आणि माधुरी दीक्षित यांची खास भेट झाली. या भेटीचे सुंदर फोटो गौतमीने सोशल मीडियावर शेअर केले असून, हे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बॉलिबूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दिक्षित करत आहे. या खास भागात माधुरी दिक्षित आणि गौतमी पाटील या दोन लोकप्रिय अभिनेत्री एकत्र आल्याचं पहायला मिळालं.