अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोयगाव रेंजमधील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात पत्र लिहिले आहे. वनविभाग आणि ग्रामपंचायतीच्या नकारात्मक अहवालानंतरही वृक्षतोड प्रस्तावित असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकल्पाला तात्काळ रद्द करण्याची मागणी दानवे यांनी पत्राद्वारे केली आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव रेंजमध्ये प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीच्या प्रकल्पाविरोधात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी प्रस्तावित वृक्षतोड तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे.