जत : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जत तालुक्यातील सोसायटी गटाच्या निवडणुकीत रविवारी शंभर टक्के मतदान झाले. आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार. आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विनोद पवार यांच्यातील प्रतिष्ठेच्या या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली, तरी मतदारांना कवठेमहांकाळची मतपत्रिका दिल्याचा प्रकार आणि गुप्त मतदानाऐवजी उघडपणे मतदान होत असल्याच्या आरोपांमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.