गणेश गोडसे बार्शी : बार्शी तालुक्यात जंगलाचे मोठे क्षेत्र आहे. विशेषतः, पांगरी, उक्कडगाव, चिंचोली परिसरात डोंगररांगा आणि वनक्षेत्र पसरलेले आहे. या जंगलात पूर्वी. या जंगलात पूर्वी चिंच, बोर, जांभूळ, आंबा, सीताफळ, बेल, करवंद, चारोळी, मोह अशी नैसर्गिक फळझाडे मोठ्या प्रमाणात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत व चालू वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे या फळझाडांचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून, त्याचा थेट परिणाम वन्य प्राण्यांच्या जीवनावर होत आहे..