सुभाष पाटीलविशाळगड : चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील घनदाट अरण्यात सध्या वन्यजीवांच्या मुक्त संचाराने जंगल सफारीला नवी रंगत आली आहे. सह्याद्री व. सह्याद्री व्याघ्र राखीव क्षेत्रातील चांदोली जंगल सफारीदरम्यान सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तब्बल १५ ते २० रानकुत्र्यांचा कळप पर्यटकांच्या नजरेस पडला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने रानकुत्र्यांचे दर्शन घडल्याने पर्यटकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय ठरला. पर्यटकांनी या दुर्मीळ वन्यजीव दर्शनाचे छायाचित्रणही केले. यावेळी नॅचरलिस्ट प्रणव महाजन उपस्थित होते. .