दिल्लीत इंडिया आघाडीच्या विराट रॅलीत शक्ती प्रदर्शन सुरू असताना, दुसरीकडे दिल्ली पोलिसांनी पाटणा येथील काँग्रेस कार्यालयावर धडक दिली. पंतप्रधान मोदींच्या आईचा एआय व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी काँग्रेस आयटी सेल सदस्य अमित कुमार मंडल यांच्या विरोधात ही कारवाई होती. काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडीने आज रविवारा दिल्लीच्या रामलीला मैदानावर प्रचंड रॅली काढली. वोट बचाओ, देश बचाओ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीत प्रचंड मोठा जनसमुदाय लोटला होता.