Crime News - ‘आपली ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी’ असा मित्रांना केला मेसेज. पुणे : लग्न होत नाही आणि प्रेम करत असलेल्या तरुणीने दुसऱ्याबरोबर लग्न केल्याच्या निराशेतून तरुणाने मित्रांना, 'आता ही शेवटची भेट, यानंतर भेटू पुढच्या जन्मी' असा मेसेज करून स्वत:च्या कपाळावर मधोमध गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. अक्षय कालिदास कांबळे (वय २६, रा. पूर्वरंग सोसायटी, पेरणे फाटा) असे या तरुणाचे नाव आहे.