सध्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत काम करणारा अभिनेता चांगलाच चर्चेत आहे. त्याने मालिकेच्या सेटवर नेमकं काय घडलं होतं हे एका मुलाखतीत सांगितलं आहे. 'हळद रुसली कुंकू हसलं' या मालिकेत जयकांत रांगणेची भूमिका साकारणारा अभिनेता अमित परब सध्या चांगलाच चर्चेत आहे. तो अल्पावधीतच महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला आहे. पण ही मालिका त्याने अचानकमध्येच सोडली. त्याच्या या निर्यणामुळे अनेकांना धक्का बसला. आता अमित परबने यामागील कारणे सांगितली आहेत.