सांगली : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल १ कोटी ११ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी नितीन शंकर यादव, शंक. याप्रकरणी नितीन शंकर यादव, शंकर ज्ञानोबा यादव, अश्विनी ऊर्फ नीशा नितीन यादव (सर्व रा. लाळगे गल्ली, खणभाग, सांगली), पवन ऊर्फ देवगोंडा पाटील (रा. राणाप्रताप चौक, कुपवाड) आणि ब्लू बर्डस् कंपनीविरुद्ध सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.