छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पावसाचा खंडकाळ अधिकप्रमाणात राहिला. अनियमितता आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकांच्या उत्पादनावर मोठे परिणाम झाले. त्यानुसार संपूर्ण जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५० पैशाच्या आत म्हणजेच अवघी ४५.७२ पैसे आली आहे..जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या सुधारीत पैसेवारीच्या आकडेवारीतून खरीप हंगाम पूर्णतः हातून गेल्याचेच चित्र दिसून येते आहे. जिल्ह्यात एकूण पेरणी क्षेत्र ७ लाख ९१ हजार ५९४.३२ हेक्टर आहे. त्यापैकी ७ लाख ५४ हजार ९५२.