कोल्हापूर : ‘रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या आदिलशहाचा सेनापती अफजल खानाला शिवछत्रपतींनी ज्या वाघनखांच्या सहाय्याने मारले ती पाहून आम्. .महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस) येथे शिवशस्त्र शौर्यगाथा-वाघनखं प्रदर्शन गेली १३ महिने सुरू होते. याचा लाभ तब्बल १ लाख ७५ हजार इतिहासप्रेमी, अबालवृद्ध नागरिकांनी घेतला. रविवारी (दि.१) प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे.