‘जब दीप जले आना’च्या सुरेल मैफलीत पत्की यांच्या सांगीतिक योगदानाचा झाला गौरव . मुंबई : आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने मराठी भावगीत, सुगम संगीत, चित्रपटगीते आणि मालिकांच्या शीर्षकगीतांना वेगळी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा विशेष सन्मान करण्यात आला. दादर येथील शिवाजी पार्क जिमखान्यात रंगलेल्या 'जब दीप जले आना' या संगीत मैफलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पत्की यांचा गौरव झाला.