Gokul Election: सामान्य प्रशासन विभागाच्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार 31 ऑक्टोबर रोजी याबाबतचा अधिकृत शासन आदेश जारी करण्यात आला. Gokul Election: गोकुळ दूध संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी मोसमी बर्डे चौगुले यांची राज्य सरकारने पदोन्नतीवर तडकाफडकी बदली केली आहे. त्यांची अपर जिल्हाधिकारीपदी (गट-अ) तात्पुरत्या स्वरूपात निवड करण्यात आली असून, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सहआयुक्त (पुनर्वसन) या पदावर त्यांची नवी पदस्थापना करण्यात आली आहे.