#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics सोलापुरच्या उजनी धरणावरील एआय डेटा सेंटर आणि इतर प्रकल्पावरून वादाची ठिणगी पडलीय.. एआय प्रकल्पाविरोधात सोलापुरातील भिमानगर येथे रास्ता रोको करण्यात आलाय.. स्थानिक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी पहिल्यांदा हा रास्ता रोको पुकारल्यानंतर...आता पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, खासदार धर्यशील मोहिते पाटील, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील, आमदार प्रतापसिंह पाटील या आंदोलनात सहभागी झाले...आंदोलकांनी तब्बल चार तास सोलापूर पुणे महामार्ग रोखून धरला...