पुणे : सार्वजनिक वाहतुकीवर दैनंदिन प्रवासासाठी अवलंबून असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा देत पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) ६० वर्षे आणि त्यावरील वयोगटातील प्रवाशांना नियमित बस तिकिटांवर ५० टक्के सवलत जाहीर केली आहे. ही योजना येत्या १ नोव्हेंबरपासून लागू होणार असून पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दींसोबतच आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील पीएमपीच्या सर्व बसमार्गांवर तिची अंमलबजावणी होणार आहे. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे.