महात्मा जोतीराव फुले यांना 'महात्मा' का म्हटलं जायचं? ज्याप्रमाणे गौतम बुद्धांनी डाकू अंगुलीमालाचे हृदयपरिवर्तन करून त्याला बौद्ध भिक्खू बनवले त्याच प्रमाणे महात्मा फुले यांची हत्या करण्यासाठी आलेल्या दोन जणांनी महात्मा फुलेंना सामाजिक कार्यात साथ दिली. त्या दोघांपैकी एक जण महात्मा फुलेंचा अंगरक्षक बनला तर दुसरे गृहस्थ सत्यशोधक समाजाचे पंडित बनले आणि त्यांनी ग्रंथरचना देखील केली. महात्मा फुलेंनी महिला आणि वंचित, शोषित शेतकरी वर्गाच्या उत्थानासाठी आपले आयुष्य वेचले.