Israel Election Result 2026 : इस्रायलमध्ये या आठवड्यात निवडणुका झाल्या. त्याचा निकालही लागला. पण तिथे अजून सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. इस्रायलमध्ये आता थेट संविधान बदलण्याचा घाट घातला जात आहे. कारण कुठल्याही एका आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. विद्यमान पंतप्रधान नेतृत्व करत असलेल्या बेंजामिन नेतन्याहू यांच्या लिकुड पार्टीच्या आघाडीला 53 जागा मिळाल्या, तेच नेतन्याहू यांच्यासमोर आव्हान निर्माण करणारे माजी सैन्य प्रमुख गादी आयजनकोट यांच्या आघाडीला 48 जागा मिळाल्या.