नवी दिल्ली : वृत्तसंस्था शुक्रवारी रात्री उशीरा दिल्लीच्या बाहेरील भागातील मंगोलपुरी औद्योगिक क्षेत्रात (फेज १) एका बूट कारखान्यात भीषण आग लागली. या. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक तास शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली आणि कारखान्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान कारखान्यातून सहा जणांना बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढण्यात आले.