जालना जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाण्यासाठी नागरिकांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू असून, ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. Jalna Water Shortage: उन्हाळ्याची चाहूल लागण्याआधीच पाणीटंचाईचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अनेक ठिकाणी पाणी मिळवण्यासाठी नागरिकांना लांब अंतर पार करावे लागत आहे. पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ काही गावांतील नागरिकांवर येत आहे.