छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनात पावसाचे प्रमाण अतिशय कमी राहिले आहे. त्यामुळे भूजल पाणी पातळी चिंताजनक स्थितीत पोहचली आहे. मागील पाच वर्षांच्या. मागील पाच वर्षांच्या सरासरी स्थिर भूजल पातळीच्या तुलनेत सप्टेंबरच्या परीक्षणनुसार भूजल पातळ तब्बल ५.४० मीटरने खालावली आहे. यात सर्वाधिक पैठण ७.१५, खुलताबाद ६.०२ आणि कन्नड ६.१८ मीटरने पाणी पातळी खालावल्याने स्थिर भूजल पातळी तब्बल १२ मीटर खोल गेली आहे.