mega block Today: मुख्य मार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर, तर ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवांच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या लोकलना भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबे असतील. त्यानंतर त्या विद्याविहार येथे पुन्हा धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.