मेघा कुचिकमुंबई : अंधेरी पूर्व येथे बुधवारी पहाटे एका व्यक्तीने गायीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला. या घटनेत गाय भाजून ज. या घटनेत गाय भाजून जखमी झाली आहे. साकीनाका पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेपासून प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली. गाय जाळण्यासोबतच आरोपीने खैरानी रोडवरील यादव नगर येथील चौधरी इस्टेट कंपाऊंडमध्ये उभ्या असलेल्या १५ मोटारसायकली, वीज मीटर आणि ३ ते ४ व्यावसायिक दुकानांनाही आग लावली.