मुंबई : मुंबईतील वाढत्या वायुप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासह प्रदूषणाच्या पातळीची अचूक माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने आणखी पाच वायू गुणवत्ता सर्. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सहकार्याने ही केंद्रे उभारण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे १८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पाच ठिकाणांची निश्चिती करण्यात आली असून, येत्या दोन महिन्यांत ही केंद्रे कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे. सध्या मुंबईत विविध यंत्रणांची मिळून २८ वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्रे कार्यरत आहेत.