मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी हाती आलीये. हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती हाती आली आहे. काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या ठाणे-मुलुंडदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला होता. मध्य रेल्वेनंतर आज शनिवारी सकाळच्या सुमारास हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरील ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाला. या बिघाडामुळे सकाळच्या सुमारास कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. त्यांना ऑफिसवर उशिरा जाण्याची वेळ आली.